Poem : माझा पिता त्रिविक्रम (by Suyashaveera Bapardekar)


माझा पिता त्रिविक्रम किती हो प्रेमळ।
त्याला त्याच्या बाळांची नेहमीच हो कळवळ।।
हाक न मारता ही संकटी धावत येई।
वाहतो बाळांचा सर्व तो भार ही।।
एक्टिव्ह गेम्स मधे आम्ही सामिल व्हावे।
म्हणून दिले ह्याने गेम्स हो बोंसाई।।
सर्वांना मुद्रा प्रशिक्षण देऊनी।
रोगांपासुनी केली हो मुक्ती।।
स्वस्तिक्षेम संवादम् मधुनी।
दिली भेट घालुनी संपूर्ण चण्डिकाकुलाशी।।
श्रीश्वासम् , श्रीशब्दध्यानयोग दिले ह्याने।
खूप तप , उपासना करुनी।।
खूप देतोस रे बाबा आम्हाला।
पण तु मात्र भाव-भक्तीचा भुकेला।।
मोठ्या आईकडे एकच मागतो।
हा झटतो गं खूप त्याच्या बाळांसाठी ,
    तु फक्त काळजी घे त्याची।।
अंबज्ञ
- सुयशावीरा बापर्डेकर
  (खारिगाव उपासना केंद्र)


Comments