Poem : माझी सर्वात प्रेमळ आई (by Ajitsinh Padhye)





आईच्या सौंदर्यापुढे "सुंदरता" हा शब्दच मुळी लाजून जातो
कारण आईच्या सौंदर्याला ममतेचा आगळा रंग चढलेला असतो

ममतेचा हा एक रंग सर्व रंगांवर संपूर्ण अधिराज्य गाजवतो
त्या एका रंगाचा प्रभाव लौकिक सौंदर्याच्या पलिकडे असतो

नंदाईच्या ममतेचा रंग तर कित्येक कोसांवरूनही जाणवतो
तिच्या प्रत्येक बाळाला समानपणे अव्याहत सुखावत राहतो

सुखावणारा हा रंग जितका तिच्या नयनांतून करुणा प्रसवतो
त्याच नयनांचा करारीपणा नाठाळांमध्ये योग्य शिस्त बाणवतो

संसाराचा बेरंग होऊ न देता सदैव सौंदर्याची उधळण करतो
नंदाईच्या ममतेचा रंग जीवनात प्रेमाचा इंद्रधनुष्य झळकवितो

बाळांचे अश्रु पाहता हाच रंग स्वत:हून अधिक गडद होत जातो
बाळांच्या नकळत क्षणात त्यांच्या अश्रुंना स्वत:मध्ये शोषून घेतो

आई, इतक्या ममतेचा साठा कसा गं तुझ्यामध्ये सामावू शकतो?
तुझ्या वात्सल्याच्या शुद्ध मूर्तीला कुठल्या उपमेने गौरवू शकतो?

तुझ्या ममतेच्या रंगाचे सौंदर्य मनात साठवत आज नमन करतो
’तुझ्यासारखी आई फक्त तूच’ उद्‌घोष करीत तुला शुभेच्छा देतो...

माझी सर्वात प्रेमळ आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा !!!

- Ajitsinh Padhye

Comments