मंचक रचिला तो हृदयाचा,
दिवटी जाळिली अहमाची,
नंदावरे दिली तुझी भक्ती,
न जाणतो तुझ्या रूपासी,
माझे अवधूत दत्तात्रायु , उदो उदो गे अवधूते,
उदो बोला उदो बोला
चंडिका
मायचा उदो बोला,
दत्त-माता अनसुयामाई गोंधळा ये ग , गोंधळा ये,
आदिमाता गायत्री तू गोंधळा ये ग गोंधळा , अज्ञानाचे झाकले पण सारण्या तू गोंधळा ये
मोठी-आई , चंडिका बाई , अशुभ नाशना सत्वर ये ,
वात्सल्याची मूर्ती माझे अनसुयामाई लवकर ये,
बाळांना या दुर्गती पासून, वाचवण्या तू लवकर ये,
ये ग ये ग येग ये ग ,बापूमाई लवकरये,
माहूरगड ची रेणुकाई गोंधळा ये ग , गोंधळा ये,
अंबापूर ची योगेश्वरी, गोंधळा ये ग , गोंधळा ये,
मंत्रामालिनी अशुभनाशनी सत्वर ये ग झडकरी ये ,
दत्तमंगल चंडिका , गुरुभक्तीस्वरूपिणी तू ये,
नंद्कन्या नंदिनी , कृष्णा तारिणी लवकर ये,
रामवरदायिनी तू, रावण-वधन्या लवकर ये,
नील-दुर्गा, अन्न-दायीनी ,शताक्षी तू सत्वर ये,
असुर भक्षण्या , रक्तदन्तिका, ये ग आई, धावत ये,
आरोग्य भवानी, महासरस्वती, अष्टभुजा नारायणी ये,
अशुभनाशनी, अंतरीक्ष स्वामिनी, महिषमर्दिनी लवकर ये,
उग्र-रूपिनी, काल-नियंत्री, महाकाली सत्वर ये,
उदो कार माउली चा, दत्तामाता अनसूयेचा,
उदो बोला
उदो बोला
अवधूतमायचा उदो बोला!!!!!
उदो बोला
उदो बो
ला
अवधूतमायचा उदो बोला!!!!!
उदो बोला
उदो बोला
अवधूतमायचा उदो बोला!!!!!
- संकेतसिंह भंडारी
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback