Poem : आई आज तू सत्वर धाव गं... (by pranilsinh Takale)

आई आज तू सत्वर धाव गं...

पुन्हा वाढतेय मजल असूरांची आई,
  आई आज गं सत्वर धाव तू...
स्वच्छंदतेची आकृती मधू,
   आणि अपवित्रता आहे कैटभ,
पुन्हा आज ते पाहत आहेत गिळू,
  आई आज गं सत्वर धाव तू...१
उन्नमत्त झालाय गं महिषासूर,
   १५ सेनापतींचेही वाढते वर्चस्व,
श्रध्दावानांच्या जीवनात पाहतो त्रास देऊ,
  आई आज गं सत्वर धाव तू...२
कुणी चढवतात मुखवटे चांगुलपणाचे,
   जसे दृष्ट शुंभ आणि निशुंभ ह्यांचे,
अवतार घे पुन्हा त्यांना संहारण्या तू,
आई आज गं सत्वर धाव तू...३
आई तुझे रक्तांग असे शरीर,
    श्वासासकट पुन्हा तू खेच असूर,
हाहाकार करण्या शांत समर्थ तू,
आई आज गं सत्वर धाव तू...४
अवकर्षण येईल जरी माते,
   तुझ्या शतनेत्रांनी पाहत रहा,
नीलवर्णा शताक्षी जगतजननी तू,
आई आज गं सत्वर धाव तू...५
प्रभू श्रीराम-रावण युध्दांत अन्,
   श्रीकृष्ण जन्म रक्षणतत्पर,
श्रीरामवरदायिनी तथा नन्दिनी तू,
आई आज गं सत्वर धाव तू...६
दत्तमंगलचण्डिका स्वरुपात तू,
  ये नेण्या श्रध्दावानाला भर्गलोकी,
मंत्रमालिनी रुपात वास कर तू,
आई आज गं सत्वर धाव तू...७
वृत्रासूराला ठेव तुच दूर,
   आई मला न पडो तुझा विसर,
जोगवा मागतो ह्या नवरात्रीला गं,
आई..
   आई आज तू सत्वर धाव गं...८
प्रणिलसिंह टाकळे

Comments