Poem : जोगवा नंदा आईचा (by Shailajaveera Bamane)


जोगवा नंदा आईचा 
मागते जोगवा माझ्या नंदा आईचा
राधा ललितेचा ,अनिरुद्धाच्या स्वप्नगंधेचा
मागते जोगवा माझ्या नंदा आईचा
दर्शन घडते तुजला पाहून ,नवविधा भक्तीच्या नवरात्री
सप्तशृंगी वणीगाडावर ,माहूरची आई रेणुका
भवानी तुळजा ,कोल्हापूरची आंबा ,जगन्माऊली जगदंबा
मागते जोगवा माझ्या नंदा आईचा
आत्मबलाची director,choreographer तूच सर्वेसर्वा
कौतुक करीसी लेकींचे ,घास भरवुनी प्रेमाचा
कृपादृष्टी तुझिया निर्भय होती वीरा
मागते जोगवा माझ्या नंदा आईचा
लेकुरे होती कृतार्थ न्हाउनी तव मायेच्या पुरा
लाभली छत्रछाया ममतेची ,श्रद्धावान करती सेवा
भासतेस तू विश्वमाता ,कोल्हापूर वैद्यकीय शिबिरा
मागते जोगवा माझ्या नंदा आईचा
संचार तुझा ग जगतावर ह्या ,तूच जगन्माता
हात तुझा बापुहाती ,पाठीराखा सूचितदा
साथ देतसे समीरदादा सदैव तुमच्या कार्या
मागते जोगवा माझ्या नंदा आईचा
गुणगान गाते आई तुझं मी ,मयूरवाहनी चिदानंदा
हर्ष मावेना मनात माझ्या न्याहाळूनि मुखचंद्रमा
राहू दे तुझिया पायी ,आश्रय एकचि मजला
मागते जोगवा माझ्या नंदा आईचा
अंबज्ञ
अनिरुद्धार्पणमस्तु .
Shailajaveera Bamane
Dubai

Comments