आई माझी चण्डिका अवतरली भूलोकी - Poem - किर्तीवीरा रोडे


आई माझी चण्डिका अवतरली भूलोकी
महिषासुराचा झाला नाश आनंद पसरला त्रिलोकी
घेऊनी रुप महाकालीचे
वधविलेस तू मधु-कैटभ
होऊनी महालक्ष्मी केलेस
दूर तू विघ्नांचे सावट
योगबळाने असुर नाशून
झालीस  तू रक्तदन्तिका
करुन भरणपोषण वसुंधरेचे
झालीस तू शताक्षी वात्सल्य चण्डिका
होऊनी अशुभनाशिनी वर देसी श्रीरामांस
नन्दिनी होऊनी तारण्या येसी प्रभू श्रीकृष्णास
दत्तमंगलाचण्डिका तू करिसी
गुरुभक्ती महती वर्णन
नित्यामंत्रमालिनी तू करीसी  कलिमलहारण
अशी माय चण्डिका तू
महिषासुरमर्दिनी
आम्हा श्रद्धावानांची तू तारकसंजीवनी
अश्विन शुद्ध दशमीस तू घडवूनी वध रावणाचा
उद्घोशिलास सिद्धांत तू रामविजयाचा
Poem by:
किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
बदलापूर (पूर्व)

Comments