"अनिरुद्ध दसरा"- Poem- संतोषसिंह कृष्णा राणे


 मन माझे भरकटताना
तूच सावरलस
 विश्वास माझा ढासळताना
तूच सावरलस
तू अनंत आहेस
तुझं देणंही अनंत!
माझ्या जीवनातल्या आणि कणाकणातल्या
महिषासुरास मारण्या....
मोठी आई चंण्डिका आहे समर्थ  
माझ्या अंतरंगातली सीमा ओलांडणाऱ्या
रावणास मारण्या अनिरुद्धराम आहे समर्थ
मला तुझं केलंस... 
तेव्हाच माझ्या जीवनाचं सोनं झालं
जीवनाचा प्रत्येक क्षण केलास हासरा
तुझ्याच अनिरुद्ध तत्वाचं आणि प्रेमाचं सोनं लुटून
करू साजरा "अनिरुद्ध दसरा"
अंबज्ञ संतोषसिंह कृष्णा राणे

Comments