Poem : : हे सद्गुरूराया

हे सद्गुरूराया,
मला डोळे आहेत....
बापूराया तू दृष्टी दिलीस!!
मला मन आहे....
बापूराया तू , भावना दिल्यास!!
मला हाथ जोडून नमस्कार करता येतो....
बापूराया तू भक्ती शिकवलीस!!
मन मानेल तसे वागत होते मी....
बापूराया तू ,श्रद्धा सबूरी शिकवलीस!!
मी घाबरट होते....
बापूराया तू धीट बनवलेस!!
मी परिस्थिती ने हताश झाले...
बापूराया तू, " जिथे आहेस तिथून सुरूवात कर" असे सांगून ,
मरगळलेल्या मनास उभारी दिलीस!!
मी पाय असूनदेखील लंगडी असते....
बापूराया तू , हाथ धरून उचित मार्गावर चालायला बळ देतोस!!
मी दिशाहीन ..भरकटलेली.. एकटी होते....
बापूराया तू, जवळ घेऊन माझ्यावर अनन्य प्रेमाचा वर्षाव करून ,
मलासुद्धा ईतरांवर तसेच प्रेम करायला शिकवलेस!!
मी सदैव कृतघ्नतेच्या ओझ्याखाली दबलेली होते....
बापूराया तू मला अनंत जन्मांची अंबज्ञता शिकवलीस!!
बापूराया तू, मला अनंत जन्मांची अंबज्ञता शिकवलीस!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
*हे बापूराया मी तुझी अनिरूद्ध अंबज्ञ आहे*🙏🏻
🌹 *बापूराया वाढदिवसाच्या तुला खूप खूप अनिरूद्ध अंबज्ञ शुभेच्छा!!* 🌹
- रसिकावीरा संत

Comments