Poem : आला क्षण तो

आला क्षण तो
आला तो दिवस
भाग्याच्या सूर्याचा
जसा पूर्ण झाला नवस
त्याच्या येण्याने
बहरले नभ
त्याच्या लोभस तेजापुढे
ठरले सारेच निष्प्रभ
अवतरताच भरले संसारास सुखाने
किरातरुद्र अन् शिवगंगागौरी संग
स्तंभिले अशुभास शुभ भक्तीने
अकारण कारुण्याचा हा झरा
क्षमा शांतीचा नवखा संगम
वाढदिवसाचे अभिष्ट देऊन
करुया याच्या चरणी वंदन

Poem by:
किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
बदलापूर(पूर्व)

Comments