Poem - "आता ये अनिरुद्धा तुझ्याशिवाय मला करमत नाही ...."


आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही

दमदार नित्याचे चालणे तुझे 
पाहिल्याशिवाय रहावत नाही

...आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही ।।१।।


तुझे मिशीला पीळ देऊन 
मिश्कीलपणे हसणे 
आठवून मन आता भरत नाही

आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही ।।२।।


बऱ्याच दिवसांपासून 
"गधड्यानों "हा ओरडा 
कानी काही पडत नाही 
तुझ्या लडिवाळ ओरड्या शिवाय 
आयुष्य पूर्ण काही वाटत नाही

आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय  मला करमत नाही  ।।३।।


कावड़ घेऊन तुझे चालने
आणि डमरू घेऊन प्रदक्षिणा करणे 
डमरुचा ध्वनी आता 
कानांची भूक काही भागवत नाही

आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही ।।४ ।।


आमच्या जीवनातील पापाचे खडे 
आम्ही चाळणीत तुझ्या टाकले 
आमचे सर्व पाप स्वतःपोटात तू घेतले
आता नको आम्हाला दुसरे काही 
"फक्त  तूच हवा आहेस " एवढेच रे मागितले

आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही ।।  ५।।


तुझ्या येण्याची चाहूल लागताच 
"हरि आला रे" आणि "आय लव यु माय डॅड"
कढे कानात प्राण एकवटला जातो 
"आता तो येणार" हा एकच विचार मनात तरळत राहतो

आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही।। ६।।


तू झटतोस रे आमच्या साठी 
आणि आम्ही पळतो रे विरुद्ध दिशेने 
पण कधी तू आमचा अव्हेर केलाच नाहीस
आमच्या पासून दूर राहताना तू केवढे कष्ट सोसत असशील

आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही ।।७।।


"सगळे "मान्य रे आहे आम्हाला 
दूर राहूनही फक्त तुलाच रे आमचा कळवळा 
पण आईवीण बाळाचा जीव होई रे बावरा 
मनाला आता एकच ध्यास 
तूच हवास दिन रात

आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही  ।।८।।


आता ये अनिरुद्धा 
तुझ्याशिवाय मला करमत नाही ....

।। हरि ॐ ।। श्री राम ।। अम्बज्ञ ।।
डॉ निशिकान्तसिंह विभुते

Comments

  1. बापू बद्दल अतीशय सुन्दर भावना मांडली आहेत.आत ये अनिरुद्ध तुझ्या शिवाय मला करमत नाही.अम्बज्ञ

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback