Poem : एकदा तरी आता ये ना !

एकदा तरी आता ये ना !

तुझी असतील अनेक रूपे
पण एकदा तरी तुझे हे  रूप डोळे भरून पाहू दे ना !

 आय  लव्ह यूमाय  डॅड चे सूर
श्री हरिगुरुग्राम मध्ये घुमू दे ना !
ओसाड वाटते तुझ्याविना श्री हरिगुरुग्रामचे मैदान
नुसताच फोटो बघून आता
किती दिवस  भागवायची तहान !

म्हणून म्हणते आता एकदा तरी तू ये ना !

पुन्हा एकदा हासत खेळत गप्पा गोष्टी कर ना !
आणि नर्मदेचे गोटे म्हटलंस तरी चालेल हं
तुझ्हा भारदस्त प्रेमळ आवाज परत एकदा ऐकू दे ना !
म्हणून म्हणते आता एकदा तरी ये ना !

गुलाबाच्या पाकळ्या सुकून जातात
वाट तुझी पाहताना,
त्यांना तरी तुझ्या चरणांचा स्पर्श होऊ दे ना !
तुझ्या डोळ्यातले ते विलक्षण सौन्दर्य
माझ्या डोळ्यांनी  मला परत पाहू दे ना

म्हणून म्हणते आता एकदा तरी ये ना

कधी वाटते बाळ होऊन तुझ्या कुशीत शिरावे
मग  वाटते आई होऊन तुलाच कुरवाळावे
कळून सुद्धा वळत नाही आम्हाला,
म्हणून होतो ना रे तुला त्रास,
तरी तू दाखविलेल्या मार्गावरून
 चालण्याचा करते प्रयास.
तरी पण एकदा तरी तू ये ना !

प्रवचन इतिहास जमा झ्हाले,
पण आता वाटते,
पितृवचन सुद्धा,
'थिंग ऑफ द पास्ट' झाले

एवढ्यातच काय एकांतात गेलास,
असे वाटते फारच तू रुसून बसलास.
पण तरी तुला सर्वांचाच लळा आहे, हो ना?

म्हणून म्हणते एकदा तरी आता ये ना !
तुला बघितल्या शिवाय कर्मतच नाही ना !
कारण………..

तुझ्या आगमनाने दरवळतो चाफ्याचं सुगंध,
तुझ्या आगमनाने आसमंत असतो धुंद,
तुझ्या आगमनाने वाराहि वाहतो मंद मंद

तुझ्या आगमनाची सर्वानाच चाहूल लागते,
सर्व काही भक्ती प्रेमाने चिंब होऊन जाते
तुझ्या आगमनाने  फुलतो प्राजक्त, लुकलुकतात चांदण्या,
कडाडतात विजा, पसरतो  धुपाचा भक्तिमय सुगंध 

म्हणून म्हणते परत एकदा ये ना
भक्ती प्रेमाने चिंब होऊ दे ना
भक्ती प्रेमाच्या पावित्र्याचा सुगंध परत परत अनुभवू दे ना

तरीही असे वाटते 'अनिरुध्दा'
तू दर गुरुवारीच ये ना
डोळे भरून तुला परत परत पाहू दे ना !

Chitraveera Tembe
 


Comments