आतुरता तुला पाहण्याची
आतुरता तुला भेटण्याची
आतुरता तुझ्याशी बोलण्याची
केलेस मजला शांत
एका कटाक्षे....
झाले होते मी अधीर
सुटत चालला होता धीर
जीवन प्रवास अती गंभीर
केलेस मजला शांत
एका कटाक्षे....
वाटे कुठे हरवला आधार
वनवासी राम, मी प्रजा बेजार
विरहाचा तो झाला असे कहर
केलेस मजला शांत
एका कटाक्षे....
भक्तीचा तू अगम्य सोहळा
तृप्तीचा तुझा मधुर मळा
करुनी माझे पंचप्राण गोळा
केलेस मजला शांत
एका कटाक्षे....
तु हवास सतत मज समोर
हसतमुख अन प्रेमळ नजर
विश्वातील असंख्य़ प्रबळ समर
होतील शांत तुझ्या
एका कटाक्षे....
Ambadnya 🙏
ReplyDeleteAmbadnya 👌👌👌
ReplyDeleteapratim Reshmaveera
ReplyDelete