Poem : अन तुझ्याच इच्छेने आयुष्य आमचे घडू दे (by Ketakiveera Kulkarni)


एकामागोमाग एक अशी
वर्षे सर्रकन सरतच गेली
आणि मी अन 'तो' प्रत्येक वर्षी
एकमेकांना शब्द देतच राहिलो

फरक फक्त एवढाच... 

मी एकही शब्द नाही पाळला
पण त्याने प्रत्येक संकल्प खरा केला
मी कितीही चुकले तरीही
'त्या'च्या प्रेमात तो मला भिजवतच गेला

मी क्षुल्लक गोष्टी मनात ठेवून 
इतरांचा राग राग केला
'त्या'च्याकडून मात्र स्वतःसाठी
क्षमेचाच अट्टाहास केला
आणि 'तो' क्षमा करतच गेला
'त्या'च्या प्रेमात तो मला भिजवतच गेला
दुःख भिडताच हक्काने
'त्या'लाच हाक मारली
ते सरताच आनंदात
'त्या'ला मात्र विसरून गेलो
पण तरीही 'त्या'ची आठवण देत 
'तो' माझ्यासाठी धावतच गेला
'त्या'च्या प्रेमात तो मला भिजवतच गेला

बाबा.. ह्या वर्षापासून तरी
तुमच्या प्रेमातच भिजत भिजत
तुमच्या सेवा अन भक्तीत माझा हातभार लागू दे
तुम्हाला आवडेल असेच माझे वागणे होऊ दे
तुमची सदैव आठवण मला राहू दे

मोठी आई... माझी आजी.. 
घे माझ्या नंदाई, बाबा आणि दादांची काळजी
प्रेम त्यांचे व तुझे असेच या आमच्यापर्यंत पोहचू दे
तुझ्या मायेची फुंकरीने उत्साह आमच्यात भरू दे
अन तुझ्याच इच्छेने आयुष्य आमचे घडू दे

नवीन वर्षाच्या अनिरुद्ध शुभेच्छा!!!
अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback