विरले जुने वर्ष हे आता
विण गुम्फली नव्या वर्षाची
भूतकाळाने वर्तमाने
धरिली वाट भविष्याची....
आम्ही लेकरे सदगुरुंची
बापूकृपे जाहलो श्रद्धावान
भाग्य उजळले अमुचे
लाभली प्रेमाची खाण
नव्हते आम्हासी ठाउक
कैसा निरोप द्यावा सरत्याला
कैसे जावे सामोरे
उगवत्या सूर्याला
दयाघन सदगुरुमाऊली.
आम्हा देई वाण श्रद्धेचे
बुद्धिस्फुरणदात्री हि माय
रुजवीते बिज भक्तिचे !
रचिले आम्ही मनोरे
प्रतिवर्षी सुसंकल्पाचे
अपुऱ्या प्रयासाला अमुच्या
तारते टेकू बापूनामाचे !
श्रीअनिरुद्धांचा शब्द वज्र
काळया दगडावरली रेघ,
"तो अंतरात उतरवण्याचा
प्रयास",
हाच दृढ़ विश्वासाचा मेघ
'बरसु दे हा तनामनात'..
हिच अमुची मनोकामना,
अनन्यता जडावी ह्याच्या पायी
नुरावी अन्य दूजी वासना !
मुखे गाऊ अनिरुद्धनाम
जोड त्यास अनुभवसंकीर्तनाची
तहान भूक आम्हा लागावी
सदा श्रीसदगुरुगुणसंकिर्तनाची
येणारे प्रत्येक वर्ष
लागो सदगुरुकार्या कारणी
तिन्ही त्रिकाळ जड़ो ध्यास तयाचा
हिच प्रार्थना मोठ्या आईचरणी
----राजश्रीवीरा चुरी
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback