माझा Valentine..
तुझ्या प्रेमाची अनुभूती नेहमीच येते रे बापुराया,
काय बोलू कसं बोलू यातच शब्द मांडत राहते..
तू समोर येताच फक्त डोळ्यांतूनच बोलू लागते,
ओठावरचे तुझे हासू मात्र हृदयाला जाऊन भिडते..
नेहमीच वाटते तुला हे सांगू कि ते सांगू पण,
मनातले सारे आपोआप तुझ्यापाशी पोहचते...
तुझ्या सोबत रुसवे फुगवे करतच माझे मन भरते,
आणि तुला मात्र गालातल्या गाल्यात हसू येत असते..
हेच तुझं खट्याळ प्रेम मला नेहमीच हवंहवंसं आहे
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक Valentine Day ला तूच माझा खरा Valentine आहेस....
I LOVE U DAD FOREVER....
Ambadnya..
स्वप्नालिवीरा आग्रे
दिंडोशी
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback