Poem : Sai Nivas



साई -निवास

साई -अनिरुद्धाचे निवास
पाऊल  ठेविता  झाला  जीव शांत

'साई'तेजस मूर्ती विलक्षण
उभा मागे विश्वव्यापक 'अनिरुद्ध '

करू लागता ध्यान 'साईनाथा '
झरती नयना गंगा -यमुना

कंठ  दाटला ,उर भरुनी आला
आनंदी आनंद मनी माझ्या

ओढ लागली भेटीची मायबापां
पाऊले चालती वाट बांद्र्याची

बोलुनी तुजसवे साई अनिरुद्धा
वाटा झाल्या मोकळ्या मनाच्या

माय माझी कृपासिंधू
बाप माझा मन: सामर्थ्यदाता

वाटे मज जाउनी येता
हक्क  पुरता माझ्या ह्या माहेरा

अनिरुद्धार्पणमस्तु

अंबज्ञ

शैलजावीरा बामणे
दुबई

Comments