अनिरुद्ध माझा
पंचमहाभूतांवर तुझीच सत्ता
चण्डिकेचा पुत्र तू
अन श्रद्धावानांचा मित्र तू
प्रेमळ पिता माझा
अनिरुद्ध माझा
हो बोला अनिरुद्ध माझा
एक मुखाने बोला
जय जय अनिरुद्ध माझा
श्रृंगी भृंगी प्रवृत्ती सारी
अंतरीच माझ्या
श्रृंगी भृंगीचा एकनाथ तू
श्रद्धावानांचा त्राता तू ..
अनिरुद्ध माझा
..
वादळ वारा सोसाट्याचा
जीव होई खाली वरी हो
मनाच्या हजार लहरी ..
लहरींवर स्वार होई तू ..
मनःसांमर्थ्याचा तूच हो राजा
....अनिरुद्ध माझा
कधी निराशेच्या जलात बुडतो
उदासीनतेच्या आहारी जातो
काळोखातील प्रकाश होई तू
मनाला उभारी देण्या येई तू
अनिरुद्ध माझा ...
आगीत जळतो प्रारब्धाच्या
काही न उरे हाती माझ्या
प्रारब्धाला जाळण्या येई
राखेतून तारण्या येई
अनिरुद्ध माझा
..
जमिनीवर पाय नाही कधी
मनाच्या स्वप्नातच रमत राही
भरकटत कुठेही जाई ..
मनाला दावण बांधान्या येई ...
अनिरुद्ध माझा
आकाशासम रिते होई मन
नजरेआड होता तू एक क्षण
तुझीच आठवण तुझीच कुणकुण
तुलाच आळवतो रे आता ...
अनिरुद्ध माझा ...
- Dr. Nishikantsinh Vibhute

Ambadnya khup sundar
ReplyDeleteअप्रतिम आहे
ReplyDelete