poem : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर


आयुष्याच्या  प्रत्येक  वळणावर
कोण मला आनंदी करतं?
कोणामुळे मी आहे?
कोणामुळे माझं अस्तित्व आहे?
कोणामुळे मी सुखी आहे?
उत्तर एकच बापू तू आहेस आयुष्या  च्या  प्रत्येक  वळणावर ||१||

पावसाच्या पाण्यात,
वाहणाऱ्या वाऱ्यात,
खिदळणाऱ्या मुलांत,
माझ्या निख्खळ हास्यात,
ओथंबणाऱ्या आसवात ,
देवा तूच तर आधार बनून उभा आहेस, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर  ||२||

सुखात तुला मी विसरतो,
दुखात तुलाच आळवतो,
पण तरीही सारखी माझी आठवण काढतोस ,आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ||३||

तुझ्या लेकरावर कधी येता संकट,
धावून आलास तू सदैव पटकन,
आज तुझ्या कृपेची प्रचिती अनुभवतोये . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ||४||

​-----​
 संकेत​सिंह ​भंडारी .


Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback