Poem : || आई ||

 

|| आई ||
तुझ्या मऊ स्पर्शाने सुखावले माझे जीवन |
मायेचा तो स्पर्श होता झाले घराचे नंदनवन ||
लेकीच्या विकासासाठी माय माझी राबते |
नजरेच्या तुझ्या आशीर्वादाने आम्हास तू तारते ||
तुझे नाव घेता आधार वाटतो आम्हाला |
तुझ्या धड्यानी नवीन आशा मिळाली आम्हा जगण्याला ||
तू उत्साहाची नदी तर बापू माझा प्रेमाचा सागर |
हाक मारण्याआधी माय बाप धावत येती सत्वर ||
आई म्हणुन हाक मारतो तुला शुभेच्छा देण्यासाठी |
आसुसले मन माझे पुन्हा कुशीत शिरण्यासाठी ||
आई वाढदिवसाच्या खुप खुप  शुभेच्छा

- Anjaliveera Gurav


Comments