माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
चंद्रकोर साजिरी शोभते, तिच्या ग भाळी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
झुबा सोन्याचा डुलतो, तिच्या ग कानी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
चाफेकळी नासिकेत शोभते, नथ ग मोत्याची
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
लखलखती कंकणे सुवर्ण, रेशीम मृदू करी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
शोभतो गळा तिच्या ग, साज कोल्हापुरी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
केसात मा ळला मा ळला, गजरा मोगरा काळी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
तिच्यामुळेच शोभा ग, पैठणीला खरी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
’हरी ओम बाळा’ म्हणत, हसते ग गाली
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
पूर मायेचा मायेचा, ओसंडून वाही
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
अस्सं लोभस, सुरेख रूप साठविले मनी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
गोरी गोरी राधिका राधिका, अनिरुद्ध सावल्याची
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
उतरते लिंबलोण इथुनी, आई तुजवरुनी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
वास राहू दे निरंतर, तुझा मम अंतरी
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
कृतार्थ मी पांघरुनी, तव ऊब मायेची
माय माझी नंदाई नंदाई, लावण्याची खाणी
जीवन जगते आनंदे, भार सोपविला तव हाती
अनिरुद्धार्पणमस्तु
अंबज्ञ
शैलजावीरा बामणे (DUBAI)
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback