Poem : तो किती क्षमाशील



तो किती क्षमाशील

मी कितीवेळा चुकावे, आणि तू प्रत्येकवेळी माफ करावे
मी परत परत त्याच चुका कराव्या आणि तू त्याचा मायेने प्रत्येकवेळी मला माफ करावे

दरवेळी मी माफी मागते, "पुन्हा असे वागणार नाही " वचन देते
तुलाच प्रत्येकवेळी सांगते, मी चुकत असेन तर सावर मला
तू प्रत्येकवेळी मला सावरत असणार, खात्री आहे मला
पण तरीही मी हट्टीपणा करून, न ऐकून, पडते मी

आणि पडल्यावर पण तूलाच दोष देते, चिडचिड करते
किती यातना देते मी नकळत तुला
पण तरीही तू तेव्हढ्याच मायेने माझ्याकडे पाहतोस
मोठ्या मनाने मला माफ करतोस

अरे बापूराया! मला माफ कर रे, मी आता पुन्हा नाही चुकणार
तू सांगितलेले सर्व ऐकेन, नीट वागेन
तू फक्त माझे बोट सोडून जाऊ नकोस
एवढेच मागणे मागायचे आहे आता तुझ्याकडे ।।

- Swativeera Awasarkar

Comments