Poem on Bapu- बापू तुझा श्रद्धावान मित्र



बापू तुझा श्रद्धावान मित्र सकाळी सकारात्मक गोष्टींनी भरलेला प्रत्यक्ष वाचतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...

बापू तुझा श्रद्धावान मित्र घराबाहेर पडताना उदीरुपी तुझा आशिर्वाद घेऊन निघतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...

बापू तुझा श्रद्धावान मित्र आव्हानांना न डगमगता सामोरे जातो कारण त्याचा बापू त्याच्या बरोबर आहेच हा विश्वास त्याला असतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...

बापू तुझा श्रद्धावान मित्र वेळ मिळेल तेथे  एकतर रामनाम लिहितो नाहीतर मंत्रगजर करतोच करतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...

बापू तुझा श्रद्धावान मित्र सेवा आणि भक्ती करून आपले प्रारब्धाचे ओझे हलके करतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...

बापू तुझा श्रद्धावान मित्र हे माहीत असून की मी कितीही चुकलो असेन तो मला कधीच टाकणार नाही, सुधारायचा प्रयास करतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...

बापू तुझा श्रद्धावान मित्र चांगल्या आणि वाईट घटनांनी विचलित न होता, हे त्रिनाथांचे नाथसंविध आहे हे मनाशी दृढ करतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...

बापू तुझा श्रद्धावान मित्र जग महायुद्धाच्या आगीत होरपळले जाणार पण माझ्या आयुष्यात मात्र रामराज्य असणार हे जाणतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...
बापुचा होण्याने हाच फरक पडतो...

-नितीनसिंह गुरव

Comments