Skill bank challenge 19 - Poem on DAD in English

Skill bank challenge 19

Challenge from Poojaveera Mahadik

Challenge to Akshaysinh Narkar

Challenge-
Dad var English madhe ek poem tayar karaichi aahe... 


Poem-

 ।।Hari Om।।

Ever since I was born,
Or even before my birth,
My Bapu is with me, always he is.

While playing in the ground,
He's always around,
While jumping from trees,
He takes care I don't hurt my knees,
For my Bapu is with me, always he is.

The day I am ill,
He restores my will,
The day I am fit,
He still doesn't rest a bit,
For my Bapu is with me, always he is.

When I am happy and sound,
His joy knew no bounds,
When I am sad,
He destroys the bad,
For my Bapu is with me, always he is.

When I am in the dark,
He becomes the guiding light,
When I am in the park,
He plays with me, trust me it's worth a sight,
For my Bapu is with me, always he is.

His love is endless,
His grace is boundless,
His care is selfless,
He is my Bapu, he is my father, he is my bestest friend,
And he is with me, always he is.

-Akshaysinh Narkar.


Experience while completing this Challenge-

| हरी ओम |

       गुरुवारी बापूंसोबत फोटो काढण्याची सुवर्ण संधी मिळाली व ते अविस्मरणीय क्षण आठवून आनंद करत असतानाच टीम - 03 च्या ग्रुप मध्ये एका नविन गोष्टीमुळे आनंद द्विगुणित झाला, आणि ते म्हणजे एका ग्रुप मेंबर ने दुसऱ्या मेम्बरला दिलेले भक्तिमय चॅलेंज. फारच स्तुत्य उपक्रम आहे असं वाटलं.

       आपला नंबर कधी येईल ह्याची वाट पाहू लागलो. आपल्याला काय चॅलेंज येईल ह्याची मनात किंचितशी भीती होती. अखेर तो क्षण समीप आला, ध्यानी मनी नसताना अचानक पुजावीरा महाडिक यांच्याकडून इंग्रजी मध्ये कविता करण्याचं चॅलेंज मिळालं. चॅलेंज चा स्वीकार तर केला, पण मनात विचार आला, आपण या आधी कधीच कविता लिहिली नाही, आपल्याला जमेल का? व ते ही इंग्रजीमध्ये? आपण प्रयास करू, बाकी बापू बघून घेईल असं ठरवलं (प्रयत्न करणे माझे काम, यशदाता तो मंगलधाम’. व पहिली ओळ सुचली. ‘My bapu is with me, always he is’ ही ती ओळ. लगेच ही ओळ लिहून ठेवली. व बाकी उद्या बघू असं म्हणून झोपी गेलो. दुसरा दिवस उजाडला, डेडलाईन ला केवळ काही तास उरले होते. पण काहीच सुचत नव्हतं. वेळ सरकत होता. डेडलाईन ला काहीच वेळ उरला होता. पण काहीच सुचत नव्हतं. शेवटी पहिली सुचलेली ओळ फक्त आळवू लागलो व तो आता सुद्धा माझ्याबरोबर आहे हे मनात ठसवलं. बस्स! बाकी सगळं आपोआप घडत गेलं. बघता बघता एक एक ओळ सुचू लागली व काही वेळातच अर्ध्याहून जास्त कविता लिहून झाली. सर्वांना म्हणजे अगदी सर्वांना कविता मनःपूर्वक आवडली.
       काही वेळापूर्वी ज्याला काही सुचत नव्हतं, त्याने अख्खी कविता लिहिली हे फक्त आणि फक्त बापूच करू शकतो. तोच बुद्धीस्फुरणदाता आहे. करता करविता तो एक. आद्यपिपांच्या शब्दात ह्या अनिरुद्धाकडे फक्त हेच मागणे मागतो, ‘ऐसी माझी गत व्हावी तुझ्या पायी, नावडावे काही तुझ्याविण’.

।।हरी ओम।। ।। श्री राम।। ।।अंबज्ञ।।


Comments

  1. Akshaysinh's knowledge of words seems to be a bit, but the poem is a HIT.

    WELL DONE, Akshaysinh.... KEEP IT UP.

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback