Skill bank challenge 21 - Poem on Bapu's Tapashcharya

Skill bank Challenge

Challenge from - Suyashaveera Bapardekar

Challenge to - Anjaliveera Gurav

Challenge-

Compose a poem on Dad's Tapashcharya, record it in your voice and make a video of it.





Poem-

तू काही थांबत नाहीस

बापू तू खूप भरभरून दिले आहेस ।
तरी तू द्यायचं काही थांबवत नाहीस।
तू काही थकत नाहीस ।
तू काही थांबत नाहीस।।

तुझी मेहनत आम्हा प्रत्येकासाठी। 
आमच्या प्रत्येकाच्या आनंदासाठी ।
तूच जप तप करी आमच्या क्षेमासाठी।
तरीही तू काही थकत नाहीस ।
तू काही थांबत नाहीस।।

तूच केलेस आम्हासाठी चंडीके आईस आवाहन।
कठीण याग तपश्चर्या करून केलेस गुरुक्षेत्रमी स्थापन।
धूप दीप नैवेद्य अर्पून करीसी पराअंबेचे पुजन।
तरीही तू काही थकत नाहीस ।
तू काही थांबत नाहीस।।

नित्य संवाद आई संगे करी हरी माझा भोळा ।
स्वस्तिक्षेम संवाद देऊन केलास मार्ग बाळासाठी मोकळा।
राजसमार्ग देऊन तुची ओढी अंतरीच्या जपमाळा।
तरीही तू काही थकत नाहीस ।
तू काही थांबत नाहीस।।

आमच्या पापांचे ओझे तुची प्रेमाने वाही।
आम्हा मनः सामर्थ्य देऊन भयमूक्त करी।
मन आमचे शांत करुन बुध्दीशी  मैत्री घडवी।
तरीही तू काही थकत नाहीस ।
तू काही थांबत नाहीस।।

 तू आहेस जगापेक्षा खूप वेगळा।
आमच्या सगळ्यांचा लाडका डॅड अनिरुद्ध सावळा।
खंबीर आधार होऊन राहतोस मात्र नामानिराळा।
तरीही तू काही थकत नाहीस ।
तू काही थांबत नाहीस।।

- अंजलीवीरा गुरव

Experience while completing this challenge-


हरिओम 

स्कील बँकच चॅलेंज आल तेव्हा छातीत काही सेंकद धस्स झाल.  दमशेराजच्या खेळामध्ये आपल्याकडे येणारी उशी जशी असते तशी माझी अवस्था . अरे आता आपल्याला काहीतरी  नविन करून दाखवायचं होतं. 
कविते पर्यंत,आॅडीयो रेकाँरडींग पर्यंत ठीक होत. मेन चॅलेंज होते व्हिडिओ बनवणे जो आतापर्यंत मी कधीच बनवलेला नव्हता.
सुयेशा वीराला मेसेज केला मदतीसाठी तीने सांगीतल युट्युब वर सर्च कर सगळं काही मिळेल त्याच्या पलीकडे ती काही सांगत नव्हती.  

रात्री बसून कवीता लीहून काढली
 बरयाच वेळा सराव केल्यानंतर मनासारखे रेकाँरडींग झाले. दिवसा अडचण येत होती म्हणून रात्रीच  ऊशीरा केल सगळे झोपल्यावर.

चांगल्या पद्धतीने कविता वाचन करावं यासाठी स्पृहा जोशी, मंगेश पाडगावकर अशा विविध कवींच्या कविता ऐकला त्यांची ऑडिओ ऐकले. कळल एवढेच की जर का प्रेमाने केलं तर सगळे छान होईल आणि तेच बापूला आवडेल.

मनात एक व्हिडीओच चित्र बनत होते डॅडचे फोटो आणि माझा आवाज याची नुसती सांगड मजा नाही येणार,  बॅकग्राऊंड मध्ये सायलेंट म्युझिक असेल तर मजा येईल म्हणून वेगवेगळे ऑडिओ गाणी ऐकायला सुरुवात केली.  सितार, गिटार, वेगळी वाद्य, तबला सगळ्यांचे ऑडिओ चेक केले, ऐकले. 

free ऑडिओ mp3 चे मिळाले त्यात मला मजा येत नव्हती आणि असं  शोधता शोधता एक ऑडिओ मिळाला पण तो डाउनलोड पेड बेसिस होणारा होता .

विचार केला आणि नवरयाच्या मोबाईलवर टोन कॉपी करून घेतली आणि तो मग  mp3 मधला ऑडिओ बनवला. Add music to voice app शोधून ठेवला होता त्यामध्ये  हा mp3 टोन माझ्या ऑडिओ ला जोडला. 

आपल्या भक्तिभाव चैतन्य ची साईट या वेबसाइटवरून फोटोग्राफ गॅलरी आहे त्यात खूप सारे तपश्चर्येचे फोटोग्राफ्स आहेत, 
गुगल साईट वरून, दादांच्या ब्लॉक पेज वरून, कवितेच्या अनुरूप फोटोग्राफ्स  डाऊनलोड केले.

विवा व्हिडिओ ॲप देखील मिळाला जेणेकरून व्हिडिओ कसा बनवता येईल याची थोडीफार कल्पना मिळाली.

आधी sample टेस्टिंग म्हणून चार-पाच फोटो आणि माझा ऑडिओ चे शब्द याची सांगड घालून एक छोटा व्हिडिओ बनवला.
आता थोडं थोडं जमायला लागलं होता.

असंच लेट नाईट बसून माझा व्हिडिओ पूर्ण  बापूंनी पूर्ण करून घेतला.

संपूर्ण कार्य करत असताना जेव्हा आपण त्या त्रिविक्रम अनिरुद्ध ला हाक मारून आणि बरोबर घेऊन आपण जेव्हा कार्य करतो ते कार्य  तो त्याच्या मनाप्रमाणे घडवून आणत असतो. 

जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन करायची इच्छा असते आणि सद्गुरुकृपा असते तेव्हा काही गोष्ट अशक्य गोष्टीही शक्य होऊन जातात, नकळत ते आपल्या हातून कधी घडलं हे आपल्यालाही कळत नाही. 

असंच काहीसं हा व्हिडिओ बनवताना झालं पण खूप मजा आली फक्त गेले -तीन दिवस फक्त माझ्यासमोर बापूच होता. 

आणि हा व्हिडिओ कसा पूर्ण होईल याच्या साठी लागलेली तळमळ एवढंच होतं.

शेवटी बापूनेच हा व्हिडिओ पूर्ण करून घेतला. अंबज्ञ बापूराया. आय लव यू डँड.

।।Hari om।।
।।Shreeram।।
।।Ambadnya।।

Comments