श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती कविता - प्रतिमावीरा खरोटे


दिवस आहे मकरसंक्रातीचा।
सगळे मी तू पण सोडण्याचा।
प्रत्यक्षपणे गोड गोड बोलण्याचा।
तुटे वाद संवाद तो हितकारी म्हणायचा।।१।।

पुजन करणार सांजवेळी।
कतराज ऋषी आश्रम स्थळी।
पाऊल पडणार मोठ्या आईचे त्यावेळी।
श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती पुजन स्थळी।।२।।

करणार गुरूक्षेञम् मंञाचा जप।
दृष्ट काढणार त्या ञिविक्रमाची।
लावणार आरतीचे दिप।
येणार वीरांना बळ कायमची।।३।।

सामर्थ्य येते या पुजनाने।
करावे प्रत्येक वीराने।
जाता घरी करावा सांबार प्रत्येकीने।
तीनवेळा तोच ढवळणार नी चाखणार प्रेमाने।।४।।

तिळगुळाची न्यारीच मजा।
गोडवा ठेवतो नात्या नात्यातला।
प्रत्येकवेळी तिला भजा।
तिळगुळ घ्या गोडगोड बोला।।५।।
-------------------------------
श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
-------------------------------
प्रतिमावीरा खरोटे/सिंह, तळेगाव स्टेशन, पुणे

Comments