Poem on Bapu - किती करतोस रे बापूयाया



किती करतोस रे 
बापूयाया...
एवढे करूनही तू मात्र 
कधीच दमत नाहीस...

कर्ता करविता तूच
तरीही नामानिराळा 
असतोस तू बापूराया...
एवढे करूनही तू मात्र 
कधीच दमत नाहीस...

आमच्या जीवनाचा 
विकास व्हावा म्हणूनी
नानाविध भक्ती सेवेचे
मार्ग काढतोस तू बापूराया...
एवढे करूनही तू मात्र 
कधीच दमत नाहीस...

एक चुक दुरूस्त 
होत नाही की हातून 
दुसरी चुक घडते रे बापूराया...
तरीही तू कधीच टाकत नाहीस 
एवढे करूनही तू मात्र 
कधीच दमत नाहीस...

भौतिक अंतराने कितीही 
लांब असलो तरी हाक मारताच 
सातासमुद्रापलीकडेही
धावतो तू बापूराया...
एवढे करूनही तू मात्र 
कधीच दमत नाहीस...

रात्रंदिवस झटतोस आमच्या 
आनंदासाठी तू बापूराया... 
तरीही आम्ही नर्मदेचे गोटेच!
आणि तरीदेखील तू क्षमा करत 
प्रेमाचा वर्षाव करतच राहतोस
एवढे करूनही तू मात्र 
कधीच दमत नाहीस...
कधीच दमत नाहीस...

-डाॅ. नयनावीरा परदेशी 
अंबज्ञ नाथसंविध् 

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback