नाही जमत नित्य भक्ती,
तरी राहायचे आहे तुझ्या चरणी,
नाही होत नेहमी मंत्रगजराचा जाप,
परी सांभाळुनी घेसी होऊनी बाप,
सेवेत पडतो अधून मधून खंड,
तरी असे तुझे फक्त प्रेमाचे मापदंड,
क्वचित कधीतरी हातून दिपोत्सव होतो,
तू आमुचा दीपस्तंभ, जीवनाचा दीप सदैव तेवत ठेवतो,
अंगी आळस, दिवस असेच फुकट जातात,
तू आम्हांस ओढून ओढून ठेवी भक्तिभाव चैतन्यात !
काळ आहे कठीण, मनावरी वाढवी ताण,
योग्य मार्गाची वाट दाखवून करिसी आम्हाला सुजाण,
प्रेम तुझे इतुके अनंत, भरून वाही जन्मोजन्मे,
कृपा असावी प्रत्येक जन्मी तुझेच बछडे होऊन राहायचे !!
अनिकेतसिंह गुप्ते
खूप सुंदर आणि जे मांडले आहे ते मला तर तंतोतंत जुळते. भक्ती.. मंत्र गजर... सेवा... आळस सर्व बाबतीत
ReplyDelete