आम्ही भाग्यवंत - Poem on Bapu


आम्ही भाग्यवंत !

जन्म घेतो आदित्य हा  क्षितिजामधुनी 
अन जीवन आमुचे प्रेम स्पर्शे निघे उजळुनी 
बापुच आहे हो आमुचा लड़का आदित्य 
आयुष्यात भरले याने नित्य चैतन्य 

आनंदाच्या लहरींना नसे आता अंत 
लाभला आम्हा सुखाचा हा ठेवा अनंत 
दिली प्रेमे याने आम्हा सुखाची परिभाषा 
याचे असणे हेची असे हो खरे सुख आम्हा 

आत्मबलाचे खत घालुनी फुलवितो आत्मविश्वास 
हाची करता आणि कराविता हाची खरा विश्वास 
असमंताला व्यापून टाके याची प्रखर ग्वाही 
जेव्हा बापू सांगे तुला कधीच टाकणार नाही 

जरी घडली हातून आमुच्या तीव्र पातके 
तरीही दिलासा आम्हा, आम्ही ह्याची बालके 
चरण तुझे हे असती आम्हा पवित्र तीर्थक्षेत्र 
पाप पुण्या पलीकडे हो आम्ही भाग्यवंत 

-सुप्रियावीरा इश्वाद

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback