अनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य कविता



   राजाधिराज अनिरुद्ध आला 
रूबाबात दमदार पावलांनी
पाहून त्याचे सुहास्यवदन 
आश्वासक , प्रेमळ नजर
बाळ आनंदाने सुखावली

भक्तीभाव चैतन्याची पर्वणी
अविस्मरणीय मायेचा सोहळा 
बापू नंदाई आणि दादांना पाहून
 हर्षोल्हासाने मन गेले भरून .
 डॅडच्या प्रेमवर्षावाने बाळ भारावली

सरत्या वर्षीच्या शुभरात्री दिला 
डॅडने बाळांना नववर्षासाठी
अचिंत्य आनंदाचा शुभसंदेश 
सच्चिदानंदाच्या सानिध्याने 
आनंद विभोर झाले सकलजन

डॅड तुझ्या सानिध्यातील हे
क्षण वाटते कधीही न संपावे 
अमृतबोल तुझे ऐकतच रहावे       
वारंवार मी हे सुवर्णक्षण पुन्हा
परत नव्याने मनी अनुभवावे  

तव कृपाकटाक्षे उजळे जीवन
तनमनाला मिळे नवसंजीवन 
तुझी प्रेमकृपा लाभो निरंतर 
भक्तीभाव चैतन्य सोहळ्याची
लाभावी पुन्हा पुन्हा अनुभूती .

डॅड तुझ्या चरणी पोहचावी 
भावभक्ती माझी साधाभोळी 
चरणांचे मिळून नित्य सामीप्य
तुझ्या कृपेचा हात सदा मस्तकी
 हीच व्हावी आयुष्याची फलश्रुती


 ।। श्रीअनिरूद्धार्पणमस्तु ।।

।।  अंबज्ञ नाथसंविध नाथसंविध नाथसंविध ।।

सौ. ज्योतीवीरा नेमुरी .
राजगुरूनगर.

Comments