आहेस तरी कोण तू.?
कोठून आला आहेस तू,
माझ्या स्वप्नात रोजच येतो तू,
अलगद मला जवळ घेऊन
डोक्यावरून मायेचा हात फिरवतोच तू,
आहेस तरी कोण तू.?
मला तुझा म्हणतोच तू,
"मी तुला कधीच टाकणार नाही" म्हणून बोट ही धरतोच तू,
आहेस तरी कोण तू.?
मी सोडले जरी बोट तुझे,
तरी घट्ट बांधून ठेवतोच तू,
आहेस तरी कोण तू.?
मी "अनिरुध्द" आहे असे म्हणतोच तू,
मग मित्र म्हणून स्वीकारायला ही लावतोच तू,
दुसरे कोणीच नाही का रे भेटले तुला माझ्याशिवाय
का इतुके कष्ट करून प्रेम करतोच तू,
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा तू,
माझं सर्वस्व कधी बनला कळलेच नाही,
पण,,,
खरच खूप छान आहेस तू,
खरच खूप छान आहेस तू...
--रुपेशसिंह ठोंबरे
अमळनेर उपासना केंद्र
अंबज्ञ
ReplyDeleteनाथसंविध्
मस्त खुपच सुंदर
ReplyDeleteSuperb.... ambadnya Naathsamvidh
ReplyDelete