माझा बापू सारी भूमिका निभावतो
कधी आई बनूनी मायेची
पांघरून घालतो तर कधी
बाप बनूनी कृपाछत्राखाली घेतो
तर कधी मित्र बनून
दिलखुलास गप्पाही करतो...
माझा बापू सारी भूमिका निभावतो
माझ्या सारख्या दगडाला आकार
देण्यासाठी शिल्पकारही बनतो
भक्ती सेवेचे धडे शिकविण्यासाठी
माझा प्रेमळ शिक्षकही होतो...
माझा बापू सारी भूमिका निभावतो
हिनदीन दुबळ्यांच्या सेवेसाठी
डाॅक्टर बनुनी धाव घेतो
तर भरकटलेल्याला दिशा
दाखविण्यासाठी वाटाड्याही होतो
माझा बापू सारी भूमिका निभावतो
माझ्या उद्धारासाठी योद्धा बनतो
मला युद्धकला शिकवतो
केवळ भक्त कल्याणासाठीच
हा युगांयुगे भूलोकी जन्म घेतो...
माझा बापू सारी भूमिका निभावतो
भवसागराच्या घे-यात अडकलेल्याला
वाचविण्यासाठी नावाडीही बनतो
एवढेच नव्हे तर खरा आनंद जीवनी
भरण्यासाठी हा सच्चिदानंदही होतो..!
-डाॅ. नयनावीरा परदेशी
अंबज्ञ नाथसंविध्
मस्तं
ReplyDelete