अनिरुद्धा तुझ्या प्रेमाची रे
पिपासा कधी संपणार नाही...
कितीही भांडलो, रागावलो तरी
तुझ्यावर प्रेम करणे कधी थांबणार नाही...
सहस्र रूपे सहस्र नाम असले जरी
अनिरुद्ध नामे घाट कधी सोडणार नाही...
सुटली जरी साथ जनाची तरी
तुझे बोट अनिरुद्धा कधी सोडणार नाही...
देवाधिदेवा आता कैसा ही येवो प्रसंग
तरी चरणकमळ तुझे कधी सोडणार नाही...
कारण, विश्वाचा खुंटा मनात तूच रोवूनी
दिलीस ग्वाही मी तुला कधीच टाकणार नाही..!
- डाॅ.नयनावीरा परदेशी
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback