बापूंनी गिरवून घेतले आपत्ती व्यवस्थापनचे धडे -Poem on AADM



कोणालाही बरे नाही ऐकूनही आधी जीव माझा धडधडे,
त्यासाठी बापूंनी गिरवून घेतले आपत्ती व्यवस्थापनचे धडे!!

बापू ७ दिवसांच्या कोर्समध्ये शिकवतात
गरज आजच्या घडीला आपत्ती निवारणाची,
न घाबरता पुढे जाऊन गरजूंना 
मदतीला हात देऊन,
तयारी करून घेतात माझ्या मनाची!!

शिकून विविध विषय बदलली आमची मानसिकता,
प्रत्येक गोष्ट घडण्यामागील कारणमीमांसा शोधण्याची
वाढली आमची वैचारीक क्षमता!!

फक्त शिक्षण नाही तर एक पाऊल पुढे टाकत 
बापूंनी दिली आम्हाला शिकवण्याची कला,
येणार्या प्रत्येक श्रद्धावानास ज्ञान देण्याचा आनंदच् वेगळा,
बापू आमचा सगळं करवून घेतो अन् राहतो कायम नामानिराळा!!

आज आधार आणि धीरासाठी आसुसलेला आहे हरेक जीव,
वेळ कुठलीही असो हाक मिळताच्
सहाय्य करण्यास धावून जातात
बापूंचे वानरसैनिक!!
कारण, 
जाणून आहोत आम्ही
आमच्या प्रत्येक कृतीमागे 
व आमच्याबरोबर साथ आहे
आमच्या चण्डिकाकुल परिवाराची

गिरवून धडे आपत्ती व्यवस्थापनाचे 
बापूंनी महत्त्व पटवून दिले घोरकष्टोद्धरणाचे 

"तु आणि मी मिळून पाही, अशक्य असे काहीही नाही" सांगत,
बापूंनी, " उद्धरेदात्मनात्मानं" पुन्हा सहजपणे वदवून घेतले


-रसिकावीरा संत

Comments

  1. अंबज्ञ.
    अगदी बरोबर,बापुंनीच आम्हाला तैयार केले.

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback