तुची रे सच्चिदानंद - Poem on Bapu



तुची रे सच्चिदानंद !


तुझे दिसणे हाची असे सच्चिदानंद सोहळा 
तुझे माझ्याशी जे आहे नाते तोची रे जिव्हाळा 

मंत्र स्तोत्र ग्रंथ सारे अडगळी बांधून ठेविले 
अज्ञानाचि धूळ झटकुनी प्रेमे तुचि हाती दिले 

नाही ठाऊक होते प्रेमभक्ति होती त्याहून लांब 
तूच धरुनी रे बोट प्रेमे चढविलासी हा घाट 

मार्ग बघ तुझ्या संगे किती रे हा सोपा झाला 
चुकले तरीही प्रेमे धरुनी आणीले तू या बाळाला 

चाखता भक्तीची गोडीशर्करा ही मागे पडली 
भक्तीचे धड़े गिरविता भक्तिभावाची पालवी फुटली 

आनंदचि आनंद भरला तुडुंब ह्या जीवनी 
आनंद झाला सच्चिदानंद नको आता णि कोणी 

भक्तिभावची शिदोरी जस जशी भरु लागे 
 चैतन्याची लाट येई मग या आयुष्या मध्ये 

ओलें चिम्ब झालो कसे भक्तिभाव चैतन्या मध्ये 
याहुनि हो जगी नाही आनंद रे आणि कुठे 

जन्म सार्थकी लागला भेटला हो बापुराया 
सच्चिदानंद हाची असे हीच गाठ घट्ट बांधा 

-सुप्रियावीरा इश्वाद 

Comments