तुला बघणं एक सोहळा
तुला ऐकणं एक सोहळा !
तुझं दर्शन एक सोहळा,
प्रेमाने डोळे मिचकावणं एक सोहळा !
तुझी भक्ती एक सोहळा
तुझी सेवा एक सोहळा !
अभंगात रमणं एक सोहळा,
भक्तीभाव चैतन्य एक सोहळा !
पादुका-पूजन एक सोहळा,
सच्चीदानंद उत्सव एक सोहळा !
तुझ्या प्रेमात भिजणं एक सोहळा,
पुन्हा पुन्हा तुझ्या रंगात रंगण एक सोहळा !
मंत्रगजर एक सोहळा,
त्रिविक्रमाची १८ वचने एक सोहळा !
चालीसा पठण एक सोहळा,
रामरसायन जागरण एक सोहळा !
पंचशील एक सोहळा,
मातृवात्सल्य ग्रंथ एक सोहळा !
रक्तदान शिबिर एक सोहळा,
कोल्हापूर मेडिकल कॅम्प एक सोहळा !
तुझी तपश्चर्या एक सोहळा,
असे एक ना अनेक अंग एक सोहळा !
तुझे मजवरी प्रेम एक सोहळा,
तुझं माझ्यासाठी असणं एक सोहळा !!
अनिकेतसिंह गुप्ते
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback