मोठी आई मोठी आई।*
*स्मरणात तू नित्य राही।*
*तुझे चित्र तू काढून घेई।*
*गालात हसत आम्हा पाही।।१।।*
*साठवले गुरूक्षेञम नयनात।*
*तूच आहे आमुच्या अंतर्मनात।*
*जाणवते इंद्रशक्ती ध्यानात।*
*बोल माझे भाबडे तू ऐकत।।२।।*
*आहे आम्ही बापूड्याची बाळे।*
*बापू तुझ्याशी नित्य बोले।*
*आम्हा बालकांना त्याने शिकविले।*
*राजांनो, संवाद साधा तिच्याशी प्रेमळे।।३।।*
*आईचा जप करत करत।*
*बसविले तिने आम्हा अंकीत।*
*करून घेतले चित्र रेखांकित।*
*शब्दच नाही माझ्या शब्द कोशात।।४।।*
*नयन तुझे आहे केविलवाणे।*
*माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते।*
*बाळांना आवडे तुझे बोलणे।*
*हेच बोल निरंतर घुमु दे प्रार्थना करते।।५।।*
------------------------------
*प्रतिमावारा खरोटे/सिंह*
*तळेगाव स्टेशन, पुणे*
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback